उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर रावेरात पाच जणांना गावबंदी

0

रावेर। आगामी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे उपद्रवींच्या कारस्थानांना आळा घालण्याच्या दृष्टीने पाच जणांना गावबंदी करण्यात आली आहे. तर मागील पाच वर्षांतील विविध गुन्ह्यात व दंगलीत सहभागी असलेल्यांना पोलीस प्रशासनातर्फे प्रतिबंधक कारवाईच्या नोटिसा बजावण्याचे काम सुरू आहे.

आतापर्यंत 90 जणांना अशा नोटिसा बजाविल्या असून आणखी सुमारे 80 जणांना नोटिसा देण्यात येतील त्यांच्याकडून उत्सव काळात चांगल्या वर्तनाची लेखी हमी घेतली जाईल 5 जणांवर गाव बंदीची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नरेंद्र पिंगळे यांनी पत्रकारांना दिली. यावेळी पिंगळे म्हणाले की पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये शांतता समिती सदस्यांच्या बैठका घेतल्या आहेत उत्सवाचे पावित्र्य राखत ध्वनी मर्यादा ठेवा असे आवाहन करण्यात आले. तसेच कायदा हातात घेणार्‍यांवर काठोर कारवाई करण्यात येईल. मुख्याधिकारी, वीज वितरण कंपनीचे अधिकारी म्हणून शहरातील गणपती स्थापना व विसर्जन मार्गाची पाहणी करणार असल्याचे सांगितले.