उत्सवात नाचतांना शॉक लागून एकाचा मृत्यू

0

धुळे । कानबाई उत्सव साजरा करीत असतांना जागराला सुरवात झाली असून या महोत्सवात विघ्न आणणारी घटना जुने धुळ्यात घडलीये. कानबाईच्या मिरवणूकीत डीजेच्या तालावर नाचत असतांना एका मुलाला विजेचा शॉक लागून जयेश खलाने (वय-16)मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली या घटनेमुळे जुने धुळे परिसरात शोककळा पसरली आहे. कानबाई उत्सवामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. कानबाईची वातज गाजत काढलेल्या मिरवणूकीत प्रत्येक जण डीजेच्या तालावर नाचत होते. अशात मिरवणूकीतल्या डीजेच्या गाडीमध्ये करंट उतरले आणि यात एका तरूणाचा मृत्यू झाला. जयेश खलाने हा इयत्ता 10 वीत शिकणारा विद्यार्थी होता. या घटनेमुळे जुन्या धुळ्यात दुःखाचे वातावरण पसरले आहे.