उत्सवादरम्यान कायदा, सुव्यवस्था राखा

0

भुसावळ । डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त तालुका पोलीस स्थानकात शांतता समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी सहाय्यक पोलीस अधिक्षक कलवानिया यांनी मार्गदर्शन केले. मिरवणूक वेळेत सुरु करुन वेळेत संपवावी. डिजे वाजविण्यावर बंदी असून कुणाच्या भावना दुखावणार नाही, मिरवणूकीस गालबोट लागणार नाही, याची दक्षता घ्यावी, दारु पिऊन मिरवणूकीत सहभागी नव्हता बाबासाहेबांनी दिलेल्या शिकवणुकीचे पालन करावे.

कायदा हातात घेणार्‍यांची गय करणार नाही
उत्सव साजरा करताना कायदा, सुव्यवस्था राखा, कायदा हातात घेणार्‍यांची गय केली जाणार नाही. अशा सुचना केल्या. यावेळी पोलीस निरीक्षक बाळासाहेब गायधनी उपस्थित होते.