उत्सव काळात जनजागृती घडविणारे कार्यक्रम राबवावेत !

0

मुंबई : शांतता व सुव्यवस्था राखणे ही प्रत्येक नागरिकाची कर्तव्ये जबाबदारी आहे. कायदा व नियमांचे काटेकोरपणे पालन करुन सण व उत्सव एकोप्याने व गुण्यागोविंद्याने साजरे करा. याबरोबरच सण व उत्सव काळात समाजात जनजागृती व समाजप्रबोधन घडविणारे कार्यक्रम राबविण्यावर विशेष भर द्या असे आवाहन सहार विमानतळ विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सुनील शेजवळ यांनी केले. याप्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक लता शिरसाट,पोलीस निरीक्षक कदम,पोनि थोपटे आदि अधिकारी उपस्थिती होते. सहार पोलीस स्थानकांत गणेशोत्सव व गोपाळकाळा सणाच्या पार्श्वभुमिवर शांतता कमिटीसह गणेशोत्सव व गोपाळकाला मंडळाच्या पदाधिकार्यांची महत्वपुर्ण बैठक पार पडली. याप्रसंगी सहायक पोलीस आयुक्त सुनील शेजवळ बोलत होते. ते पुढे म्हणाले की प्रत्येक सण उत्सव हे एकत्रीकरणासाठी व आनंद मिळविण्याकरीता येतात. सार्वजनिक मंडळांनी उत्कृष्ठ सजावट व देखाव्याद्वारा राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव व समाजप्रबोधन घडवून आणावे.

धार्मीक, जातीय सलोखा महत्वाचा
विदयार्थी, महिला व ज्येष्ठ नागरीकांना लोकोपयुक्त ठरणारे उपक्रम राबवावेत. बैठकिला मार्गदर्शन करताना वपोनि लता शिरसाट म्हणाले कि, सहार परिसर येथे सामाजिक, धार्मीक व जातीय सलोखा आहे. येथील वातावरण निकोप आहे. नागरीक व पोलीस यांच्यात योग्य समन्वय आहे. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून येथील नागरीक वागत आहेत. दिवसागणिक जनरेशन, युवा वर्ग व संदर्भ बदलत आहे. अशातच न्यायालयाने बंधनकारक केलेल्या नियम व अटींचे पालन करा. सण व उत्सव काळात कुणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्या. मिरणूक वेळेत काढा. महिलांची छेडछाड होणार नाही याची विशेष दक्षता घ्या. काही प्रकार घडल्यास तत्काळ पोलीसांना माहिती द्या. सण व उत्सवकाळात अनुचीत प्रकार घडू नये याकरीता शांतता कमिटी व मंडळाच्या पदाधिकार्यांनी 24 तास सतर्क व जागरुक राहा. असे आवाहन शेवटी सहारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लता शिरसाट यांनी केले.