उत्सव निर्विघ्नपणे पडणार पार : 88 उपद्रवींना 12 सप्टेंबरपर्यंत भुसावळ तालुका बंदी

88 miscreants from Bhusawal taluka ‘prohibited’ up to 12 from entering the Taluka भुसावळ : गणेशोत्सव शांततेत व निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी 88 उपद्रवींना तालुक्यात येण्यास बंदी घालण्याचे आदेश प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांनी काढल्याने उपद्रवींच्या गोटात खळबळ उडाली आहे. भुसावळ तालुक्यातील उपद्रवींमुळे शांतता भंग होऊ नये म्हणून पोलिसांनी खबरदारी म्हणून त्यांच्यावर उत्सव काळात तालुक्यात येण्यास बंदी आणण्याचे प्रस्ताव प्रांताकडे पाठविले होते.

उत्सव निर्विघ्नपणे पडणार पार
गणेशोत्सव काळात कुणीही उपद्रव करून समाजात अशांतता व तेढ निर्माण करू नये म्हणून पोलिस उपविभागीय अधिकारी यांनी प्रांताकडे उत्सव काळात उपद्रवी लोकांना बंदी घालण्याबाबतचे प्रस्ताव पाठवले होते. या प्रस्तावांना 31 रोजी प्रांताधिकारी यांनी मंजुरी दिलेली असून 88 उपद्रवींना उत्सव काळात तालुक्यात येण्यास बंदी करण्यात आली. बाजारपेठमधील 56, शहर पोलीस स्थानकांतर्गत 26 तर तालुका अंतर्गत सहा अशा 88 उपद्रवींना 12 सप्टेंबरपर्यंत शहरात येण्यास बंदी करण्यात आली. उपद्रवींना नोटीसा बजावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.