उत्साहाच्या भरात त्याने वाटली 50 किलो मिठाई

0

राजकोट । कोणाला कुठल्या गोष्टीमुळे आनंद मिळेल याचा अंदाज कुणीच बांधू शकणार नाही. लग्नासारख्या, दोन जिवांना एकत्र आणण्याच्या सोहळ्यात मिठाई वाटली नसती तर आश्‍चर्य वाटले असते. पण, राजकोटच्या एका व्यावसायिकाने चक्क घटस्फोट मिळाल्याचा आनंद साजरा करताना आपल्या परिचितांना तब्बल 50 किलो मिठाई वाटली. 26 वर्षीय रिकेशने घटस्फोटाचे सेलिब्रेशन असे काजू बर्फीच्या बॉक्सवर लिहीत, महिला आपल्या हक्कांचा कसा गैरवापर करत आहेत यासंदर्भात एक चिठ्ठीही त्या बॉक्समध्ये ठेवली आहे.

रिंकेशने दोन वर्षापूर्वी घटस्फोटसाठी अर्ज दाखल केला होता. बायकोने आपल्या कुटुबियांपासून वेगळे रहायचे आहे असे सांगितल्यावर आपण घटस्फोटासाठी अर्ज केला. त्यानंतर महिलांच्या बाजूने असलेल्या कायद्यांची माहिती मिळाल्याचे रिकेशने सांगितले. पोटगी दाखल मागितलेली रक्कम खूपच जास्त होती त्यामुळे घटस्फोटाची प्रकिया पूर्ण होण्यास वेळ लागल्याचे रिंकेशने सांगितले. दरम्यान घटस्फोट झाल्यापासून आपल्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असल्याचे रिंकेश म्हणाला. अनेक पुरुषांनी तुमचा आनंद समजू शकतो अशी प्रतिक्रिया दिली. अनेक महिलानी, त्यांच्या त्सुनांनी त्यांच्यासोबत केलेल्या व्यवहारांची माहिती दिल्याचे रिकेंशने सांगितले. दरम्यान, एक घटस्फोट झाला असला तरी पुढे आपण दुसरे लग्न करणार असल्याचेही रिंकेशने स्पष्ट केले आहे.