सातारा । खंडणी व हत्येच्या प्रयत्नाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे आता उदयनराजे भोसले यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे अटकेपासून वाचण्यासाठी आता उदयनराजे भोसले यांना पुढे अपील करावे लागणार आहे. नेहमी आपल्या आक्रमक भाषा आणि मारझोडीच्या स्वभाव तसेच व्यक्तीमत्त्वावरून नेहमीच चर्चेत राहणारे उदयनराजे भोसले हे सध्या त्यांच्या याच स्वभावामुळे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. अशा सर्व परिस्थितीत त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळूण लावल्याने त्यांच्यासमोर आता मोठे संकट उभे राहिले आहे.
काय आहे जैन प्रकरण?
लोणंद येथे सोना अलाईज कंपनीचे मालक राजीव जैन यांना 18 फेब्रुवारीला खासदार उदयनराजे भोसले यांनी येथील सर्किट हाऊसवर बैठकीसाठी बोलाविले होते. ‘कंपनीतील कामगारांचे काय झाले?,’ असे विचारून उदयनराजे यांनी त्यांना मारहाण केली. त्यानंतर उदयनराजे यांच्या समर्थकांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप जैन यांनी केला होता.
आता सर्वोच्च न्यायालयाचा पर्याय!
दरम्यान, खासदार उदयनराजे भोसले यांनी या घटनेनंतर न्यायालयात तात्काळ अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. त्यावर न्यायालयाने उदयनराजेंना तात्पुरता अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला होता. गेल्या काही दिवसांपासून उदयनराजेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी सुरू होती. त्यावर अंतिम निर्णय न्यायालयाने घेतला.