अमळनेर- गांजा तस्करीप्रकरणात उदय वाघ व गांजा तस्कर कंजरची नार्कोटेस्ट करण्याची हिम्मत दाखविल्यास मी राजकीय त्याग करेल, असे आव्हान राष्ट्रवादीचे नेते अनिल भाईदास पाटील यांनी दिले आहे. व्हिडिओ रेर्कार्डींग बनावट असल्याचा पुरावा उदय वाघ यांच्याकडे आहे का? असा सवालही अनिल पाटील यांनी उपस्थित केला आहे. सत्ताधारी पक्षाचे जिल्हाध्यक्ष असल्याने हे प्रकरण दडपण्याचा वरपर्यंत प्रयत्न होईल, याबाबत आधीच शंका उपस्थित केली होती, तसेच कंजर नामक व्यक्ती याच्यावर पोलिसांमार्फत दबाव आणून हे प्रकरण दाबवण्याचा जिल्हाध्यक्ष प्रयत्न करीत असल्याचे अनिल पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे.