मुंबई : इम्रान हाश्मीची ‘जहर’ चित्रपटातील हिरोइन उदिता गोस्वामी पुन्हा एकदा आई बनणार आहे. उदिताचे हे दुसरे बाळ आहे. याआधी तिला एक मुलगी असून तिचे नाव देवी असे आहे. ही बातमीची माहिती चित्रपट निर्माता मिलाप झवेरी यांनी ट्विटवर दिली.
काही दिवसांपूर्वी उदिताने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर बेबी बंपसोबत काही फोटो चाहत्यांसाठी शेअर केले होते.