पिंपरी : रिक्षातून उतरलेल्या प्रवाशाला रिक्षा चालकाने पाठलाग करून चोरीच्या उद्देशाने धारदार हत्यार, लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 28) रात्री दहाच्या सुमारास नेहरुनगर येथे घडली. याबाबत भरत रामनाथ पाटील (वय 56, रा. यशवंतनगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी रोहन रानू शिंदे याला पिंपरी पोलिसांनी संशयावरून चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. भरत पाटील हे सुरक्षा अधिकारी आहेत. मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास ते पिंपरीतील आंबेडकर चौकातून रिक्षामध्ये बसून नेहरुनगर येथे गेले. तेथून टाईम्स ऑफ इंडिया या कंपनीकडे पायी जात असताना त्याच रिक्षातील चार जणांनी पाटील यांचा पाठलाग केला. चोरीच्या उद्देशाने पाटील यांना धारदार हत्यारे, लाकडी दांडक्याने डोक्यावर, छातीवर आणि हातावर बेदम मारहाण केली आणि आरोपी पसार झाले.