‘उद्धवश्री पुरस्कार’ वितरण सोहळा बुधवारी रंगणार

0

पिंपरी-चिंचवड : शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त देण्यात येणार्‍या ‘उद्धवश्री पुरस्कार 2017’चा वितरण सोहळा बुधवारी (दि. 9) रोजी सायंकाळी पाच वाजता चिंचवडमधील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात उद्योगमंत्री सुभाष देसाई, जलसंपदामंत्री विजय शिवतारे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती उद्धवश्री पुरस्कार समितीचे संस्थापक अध्यक्ष व शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख बाबासाहेब धुमाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी समितीचे अध्यक्ष देवराम गावडे, कार्याध्यक्ष राहुल कलाटे, उपाध्यक्षा सुशीला पवार, संपत पवार, खजिनदार रमेश जाधव, कविता जिंदल, सचिव गुलाब गरुड, सहसचिव अमित धुमाळ, तेजस डेरे, राम पात्रे, शिवाजी कुर्‍हाडकर, युवराज कोकाटे, बेबी सय्यद, सारिका तामचीकर आदी उपस्थित होते.

यांची उपस्थिती लाभणार
या पुरस्कार वितरण सोहळ्यास संपर्कप्रमुक डॉ. अमोल कोल्हे, शिवसेना उपनेते शशिकांत सुतार, संपर्कप्रमुख बारामती सत्यवान उभे, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार श्रीरंग बारणे, आमदार अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार, चित्रपट अभिनेता प्रसाद ओक, संजय लोंढे, अभिनेत्री स्मिता गोंदकर, उद्योजक विजय शिर्के, राजू सांकला, कृष्णकुमार गोयल आदी उपस्थित राहणार आहेत.

यांचा पुरस्काराने गौरव होणार
अखिल भारतीय क्रिकेट निवड समितीचे माजी अध्यक्ष चंदू बोर्डे (क्रीडा), वीरेंद्र म्हैसकर (सार्वजनिक बांधकाम व्यावसायिक), धनराज पिल्ले (पद्मभूषण, हॉकी), भाग्यश्री पाटील (शैक्षणिक), प्रकाश देवळे (माजी आमदार), डॉ. सतीश देसाई (सामाजिक), राजू भोसले (उद्योजक), अक्षय बाहेती (सनदी लेखापाल), शिवराज चापुले (उद्योजक), प्रमोद भावसार (वाहतूक व्यावसायिक), सुनील अजवानी (सार्वजनिक बांधकाम व्यावसायिक), अनंत पाटील (प्रशासकीय), अ‍ॅड. सत्यनारायण चांडक (कायदा विषयक), कमलताई सोंजे (साहित्यिक), डॉ. बाळासाहेब पाटील (वैद्यकीय), संजय माने (पत्रकारिता) यांना यावर्षीचा ‘उद्धवश्री पुरस्कार 2017’ देऊन गौरविण्यात येणार आहे.