उद्धव ठाकरेंचा दौरा

0

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे येत्या बुधवारी 12 जुलै रोजी उत्तर महाराष्ट्रच्या दौर्‍यावर जाणार आहेत. ठाकरे यावेळी जळगाव आणि धुळे या दोन जिल्ह्यातील शेतकर्‍यांशी संवाद साधणार असून एकाच दिवशी तब्बल दोन सभा यावेळी शेतकर्‍यांसाठी घेणार आहेत. पहिली सभा एरंडोल पाटोळा येथे दुपारी दीड वाजता होणार असून, दुसरी सभा धुळ्यात 3 वाजताच्या दरम्यान होणार आहे.