उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद: भाजपच्या ‘त्या’ मिलाफाचे अभ्यास करून आघाडीचा निर्णय !

0

मुंबई: शिवसेनेला पाठींबा देण्याबाबत आज कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये बैठक झाली. बैठकीनंतर दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी दोन्ही पक्षाच्या बैठकीत दोन्ही पक्षामध्ये चर्चा झाली. मात्र शिवसेनेकडून स्पष्टीकरण झाल्यावर निर्णय जाहीर करू असे यावेळी सांगण्यात आले. आघाडीच्या वक्तव्यामुळे शिवसेनेची कोंडी झाली आहे. दरम्यान आता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील पत्रकार परिषद घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि मुफ्ती मोहम्मद कसे एकत्र आले?, नितीश कुमार भाजप एकत्र कसे आले?, चंद्राबाबू आणि भाजप एकत्र कसे आले? ही सगळी माहिती मी मागविली आहे. यानंतर आम्ही भिन्न विचारधारेचे लोक एकत्र कसे येणार आहोत याबाबत स्पष्टीकरण देऊ असे सांगत भाजपला टोला लगावला. शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल असे सांगत त्यांनी कॉंग्रेस, राष्ट्रवादीसोबत आघाडीचे संकेत दिले आहे.

काल अधिकृत शिवसेनेने आघाडीला पाठींबा देण्यासाठी संपर्क केला. आमच्या मित्रपक्षांनी जी आमची बदनामी केली त्याला उत्तर खुद्द आघाडीने दिले आहे. आम्ही आघाडीच्या संपर्कात नव्हतो हे सिद्ध झाले आहे. आम्हाला ४८ तासाची वेळ हवी होती, पण ती देण्यात आली नाही. आघाडीला स्पष्टता हवी आहे तसे सेनेला देखील स्पष्टता हवी होती, त्यामुळे वेळ लागले असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

राज्यपालांना टोला

राज्याला दयावान राज्यपाल लाभला आहे, त्यांनी आम्हाला ४८ तासाची वेळ न देता ६ महिन्याची वेळ दिली आहे. निश्चितच राज्यपाल दयावान आहेत असा टोला उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना लगावला.

भाजपच्या शुभेच्छांचा सन्मान

भाजपच्या खोटेपणामुळे आम्ही दुखी झालो. चंद्रकांत पाटील यांनी देखील आम्हाला शुभेच्छा दिली आहे, त्यामुळे आता मित्राकडून आलेल्या शुभेच्छांचा सन्मान झाला पाहिजे असे सांगत उद्धव ठाकरे यांनी भाजपला कोपरखळी हाणले.