BREAKING: उद्धव ठाकरेंनी घेतली मोदींची भेट !

0

नवी दिल्ली: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेत आहे. भाजपसोबतचे संबंध ताणले गेल्यानंतर राज्यात स्थापन झालेल्या महाविकास आघाडीच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे विशेष लक्ष लागले आहे. मोदींना भेटण्यासाठी उद्धव ठाकरे दिल्लीला पोहोचले आहे. मोदींच्या ७ लोक कल्याणमार्गावरील निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदींची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत मंत्री आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते.

पंतप्रधान मोदींना भेटल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेणार आहे. मुख्यमंत्री म्हणून आणि कॉंग्रेससोबत आघाडी केल्यानंतर उद्धव ठाकरे प्रथमच सोनिया गांधी यांची भेट घेणार आहे.