उद्धव ठाकरेंनी शब्द पाळला नाही: अमित शहांचा हल्लाबोल

0

सिंधुदुर्ग: भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या रुग्णालयाचे उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते झाले. यावेळी अमित शहांनी राज्यातील ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. सत्तेच्या लालसेपोटी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले आहे. शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली असल्याची टीका अमित शहा यांनी केली.

उद्धव ठाकरेंनी शब्द पाळला नाही, सत्तेच्या लालसेपोटी कॉंग्रेससोबत मैत्री केली, बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली. महाराष्ट्राची जनता महाविकास आघाडी सरकारला त्यांची जागा दाखवून देईल अशी टीकाही अमित शहा यांनी केली.