उद्धव ठाकरे कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांची भेट घेणार !

0

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपला पाठींबा दिल्याने मुख्यमंत्री पदाची देवेंद्र फडणवीस यांनी तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या राजकीय घटनेनंतर संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली होती. यावर कालच राष्ट्रवादीने अजित पवारांची गटनेते पदावरून हाकलपट्टी केली होती. दरम्यान आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षाच्या आमदारांची भेट घेणार असून त्यांच्याशी चर्चा करणार आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे आमदार हॉटेलमध्ये थांबून आहेत, त्याठिकाणी जाऊन उद्धव ठाकरे कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या आमदारांची भेट घेणार आहे. दुपारी २.३० वाजता राष्ट्रवादी तर ३ वाजता कॉंग्रेस आमदारांची उद्धव ठाकरे भेट घेणार आहे.

काही वेळापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हॉटेलमध्ये जाऊन राष्ट्रवादीच्या आमदारांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे आमदार फुटू नये यासाठी आता प्रयत्न केले जात आहे. शिवसेनेने देखील सेना आमदार फुटू नये यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहे.