उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर

0

पिंपळनेर । शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळनेर तालुका शिवसेनेच्यावतीने आयोजीत केलेल्या रक्तदान शिबिरात 56 युवक शिवसैनिकांनी रक्तदान करून वाढदिवस साजरा केला. हा कार्यक्रम पिपळनेर शिवसेना युवासेना वाहतुक सेना, महिलाआघाडी व सर्व कार्यकर्ते पदाधिकारी,पिंपळनेर शिवसेना तालुका प्रमुख दत्तु गुरव, युवासेना तालुका प्रमुख अभय शिंदे, वाहतुकसेना तालुका प्रमुख, ज्ञानेश्वर पगारे, पिंपळनेर तालुका महिला आघाडीच्या रजनी आढे ,पिंपळनेर शिवसेना शहर प्रमुख उदय बिरारी, वाहतुकसेना शहर प्रमुख हर्षल फटकाळे, वाहतुकसेना उपतालुका प्रमुख सुशिल पाटील, शिवसेना विभाग प्रमुख मनोज खैरनार, भगवान पगारे, महिला शहर प्रमुख अलकाताई जाधव, युवासेना तालुका उप अधिकारी गजू जाधव, शिवसेना उप शहरप्रमुख टिनू वाघ, युवासेना शहर अधिकारी राजेश पवार, वाहतुकसेना उपशहर अध्यक्ष संजय पाटील व समस्त कार्यकर्ते यांनी सहभाग नोंदविला.

ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शिबीरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.शिबीर ग्रामपंचायत सभागृहात घेण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. स्व.डॉ. जी.एम.भावसार चॅरीटेबल ट्रस्टच्या मालेगाव ब्लेड बॅकचे सहकार्य लाभले.