मुंबई- आगामी निवडणुकीत भाजपने शिवसेनेसोबत युती करण्यासाठी चांगलाच आग्रह धरला आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे जपानमधून परदेशवारी करून मुंबईत परत येताच त्यांच्या भेटीचे वेळ मागितली होती. परंतु उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या नेत्यांना भेटण्यास टाळल्याने या युतीला चर्चेला ब्रेक लागल्याचे सध्याच्या घडामोडींवरून वाटत आहे. तसेच शिवसेना भाजपच्या नेत्यांसोबत युतीविषयी तसेच कोणत्याही मुद्यांवर बोलण्यास तयार नसल्याचे समजते.