जळगाव । येथील श्री समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आव्हाणे शिवार येथे रक्षाबंधनानिमित्त बंधूरुपी वृक्षाला राखी बांधण्यात आली. वृक्षापासून फळ, फुले, ऑक्सिजन, लाकुड, औषधी, कागद इत्यादी जीवनावश्यक वस्तू मिळतात.
अशा या पर्यावरणाच्या रक्षण करणार्या या वृक्षाला रक्षाबंधनानिमित्त राखी बांधून वृंक्षांचे संवर्धन व रक्षण याविषयी हरित सेना मास्टर ट्रेनर प्रविण पाटील यांनी मार्गदर्शन केले व वृक्ष संवर्धनाचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला. संस्थेचे प्रशासन अधिकारी अनिल चव्हाण, मुख्याध्यापिका वैशाली शिंदे, अक्षय सोनवणे उपस्थित होते. प्रियंका पाटील, चारुशिला साबळे, महेंद्र साळुंखे, सचिन वंजारी यांनी परिश्रम घेतले.