नागपूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनि उद्या रविवारी रात्री ९ मिनिटासाठी लाइट बंद करण्याच्या केलेल्या आवाहनावरून आजी-माजी ऊर्जामंत्री यांच्यात जुंपली आहे.
रविवारी रात्री 9 वाजेपासून 9 मिनिटे लाइट बंद केल्यास त्याचा नॅशनल ग्रीडवर काहीही परिणाम होणार नाही. याबाबतचा तांत्रिक अभ्यास आणि नियोजन करण्यासाठी राज्याकडे पुरेसा वेळ आहे. त्यामुळे विद्यमान ऊर्जामंत्र्यांनी दिशाभूल करू नये, अशी टीका माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. देशात यापूर्वी १५ हजार मेगावाट विजेचे बॅकडाऊन झाले आहे. राज्यातही २५०० मेगावाटचे बॅकडाऊन झाले आहे. पंतप्रधानांनी फक्त ९ मिनिटे लाईट बंद करण्यास सांगितले आहे. विजेची अन्य उपकरणे मात्र सुरू राहणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय ग्रीडवर त्याचा परिणाम होणार नाही, असेही बावनकुळे म्हणाले आहेत. विद्यमान ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी एकाचवेळी लाईट बंद ठेवण्याचा विपरित परिणाम वीज यंत्रणेवर होईल, अशी भीती व्यक्त केली आहे.