उद्यानगणेश शालेय कबड्डी स्पर्धा

0

मुंबई । उद्यानगणेश मंदिर सेवा समिती-शिवाजी पार्कतर्फे मुंबई, ठाणे परिसरातील 16 वर्षांखालील मुलामुलींच्या शालेय संघांची उद्यानगणेश मंदिर कबड्डी स्पर्धा 20 व 21 डिसेंबर दरम्यान शिवाजी पार्क मैदानात आयोजित करण्यात आली आहे. हि शालेय कबड्डी स्पर्धा विनाशुल्क प्रवेशाची असून प्रथम येणार्‍या शालेय मुलांच्या व मुलींच्या प्रत्येकी 24 शालेय कबड्डी संघांनाच प्रवेश दिला जाणार आहे.

सहभागी संघांतील सर्व खेळाडूना विनामूल्य कबड्डी टी शर्टस व अल्पोपाहारसह व्यवस्था करण्यात येणार आहे. उद्यानगणेश शालेय कबड्डी स्पर्धेच्या मुले व मुली विभागातील अंतिम विजेत्यास पाच हजार रुपये, उपविजेत्या संघाला तीन हजार रुपये आणि तृतीय क्रमांकास एक हजार रुपयांचा पुरस्कार दिला जाणार आहे. तसेच स्पर्धेतील सर्वोत्तम कबड्डीपटू, उत्कृष्ट चढाई व उत्कृष्ट पकड यासाठी वैयक्तिक पुरस्कार व सहभाग प्रशस्तीपत्र आहेत. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणार्‍या मुलांच्या अथवा मुलींच्या शालेय कबड्डी संघांनी प्रवेश अर्जासाठी व्यवस्थापक संजय आईर (8655233778) अथवा दिलीप पाटील (9920316437) उद्यान गणेश मंदिर कार्यालय (24466634), स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, शिवाजी पार्क, दादर-पश्‍चिम, मुंबई-28 येथे 01 डिसेंबरपर्यंत संपर्क साधावा.