पिंपरी : महापालिकेच्या उद्यान विभागाच्या निविदा काढण्यास विलंब केल्याबाबत उद्यान अधिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांचे खरेदीचे अधिकार आयुक्तांनी काढले होते. परंतु, स्थायीच्या सदस्यांनी बुधवार उद्यान अधिक्षकाला खरेदीचे अधिकार देण्याची जोरदार मागणी केली. त्यानंतर स्थायी समितीने मुख्य उद्यान अधिक्षक सुरेश साळुंखे यांना आर्थिक अधिकार प्रदान करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.
उद्यान विभागाची चांगली माहिती
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागाच्या देखभालीचे काम करणा-या खासगी संस्थाची मुदत सव्वा वर्षापूर्वी संपली होती. मात्र, त्याची कोणतीही निविदा न काढता. त्याच संस्थांना उद्यान देखभालीच्या कामाची वारंवार मुदतवाढ दिली जात होती. त्यावरुन पदाधिकार्यांनी उद्यान विभागाला धारेवर धरले होते. स्थायी समिती बैठकीत नगरसेवकांनी सुरेश साळुंखे यांना खरेदीचे अधिकार देण्याची जोरदार मागणी केली. त्यांना उद्यान विभागाची चांगली माहिती आहे. शहरातील झाडांच्या फांद्या वाढल्या आहेत. परंतु, त्यांच्याकडे आर्थिक अधिकार नाहीत. त्यामुळे अडचणी येत आहेत. त्यासाठी साळुंखे यांना खरेदीचे अधिकार देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या नगरसेवकांनी केली. त्यानंतर साळुंखे यांना खरेदीचे अधिकार देण्याची सूचना स्थायी समितीने प्रशासनाला केली.