खडकी । खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील 19 उद्यानांच्या वर्षभराच्या देखभाल दुरुस्तीसाठी एक कोटी 38 लाख 60 हजार रुपये खर्चाची निविदा बोर्डासमोर नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये मांडण्यात आली होती. गेल्या वर्षी बोर्डाने 12 उद्यानांचे काम ठेकेदारी पद्धतीने दिले होते. यंदा त्यामध्ये आणखी सात उद्यानांची भर घालण्यात आली. तसेच रेंजहिल्स आणि अन्य वॉर्डातील काही उद्यानेही यामध्ये घ्यावीत, अशी मागणी बोर्डाच्या सदस्यांनी केली होती. त्यामुळे यंदाच्या वर्षी उद्यानांची संख्या ही 22 ते 25पर्यंत जाण्याची शक्यता आहे. मात्र, कोणताही सखोल तपशील आणि कामाची विभागणी देण्यात आली नसल्याने ही निविदा रद्द करण्यात यावी असे आदेश बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर धिरज मोहन यांनी दिले.
यंदा या कामासांठी तीन ठेकेदारांच्या निविदा
खडकी बोर्डाच्या हद्दीत लहान-मोठी अशी 19 उद्याने आहेत. ज्यांचा गार्डन एरिया 55 हजार 558 चौरस फुटांच्या जवळपास आहे. त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी बोर्ड दरवर्षी निविदा काढते. यंदा या कामासाठी तीन ठेकेदारांनी निविदा भरल्या. त्यामध्ये एका ठेकेदाराने सर्वांत जास्त म्हणजे महिन्याला 12 लाख 77 हजार पाचशे म्हणजे वर्षाला एक कोटी 53 लाख 30 हजार रुपये, दुसर्या ठेकेदाराने त्यापेक्षा थोडे कमी म्हणजे महिन्याला 12 लाख 25 हजार रुपये म्हणजे वर्षाला एक कोटी 47 लाख रुपये आणि तिसर्या ठेकेदाराने दरमहा 11 लाख 55 हजार रुपये म्हणजे वर्षाला एक कोटी 38 लाख 60 हजार रुपयांची निविदा भरली. गेल्या वर्षी बोर्डाने 12 उद्यानांचे काम ठेकेदारी पद्धतीने दिले होते. यंदा त्यामध्ये आणखी सात उद्यानांची भर घालण्यात आली. तसेच रेंजहिल्स आणि अन्य वॉर्डातील काही उद्यानेही यामध्ये घ्यावीत, अशी मागणी बोर्डाच्या सदस्यांनी केली होती. त्यामुळे यंदाच्या वर्षी उद्यानांची संख्या ही 22 ते 25पर्यंत जाण्याची शक्यता आहे.
कंपनीचा दर सर्वांत कमी
गेल्या वर्षी ज्या कंपनीने काम केले होते. यंदाही याच कंपनीचा दर सर्वांत कमी आहे. 19 उद्यानांच्या देखभाल दुरुस्तीसाठी 50 प्रशिक्षित माळी, तसेच त्यासाठी साधणे आणि साहित्याचा समावेश आहेत. मात्र, एवढी मोठी रक्कम देखभालीसाठी देताना त्यामध्ये कामांचे विभाजन दाखवण्यात आले नाही, तसेच माळींना दरमहा वेतन किती दिले जाईल. साहित्य आणि साधणे किती लागतील. तसेच मेंटेनन्स म्हणजे त्यामध्ये काय केले जाणार आहे, याचा उल्लेख निविदांच्या अटी आणि शर्तीमध्ये टाकून कामाचा, कामगारांचा व खर्चाचा तपशील देऊन निविदा मागवाव्यात असे आदेश बोर्डाचे अध्यक्ष धिरज मोहन यांनी दिले. त्यामुळे उद्यानांच्या देखभालीच्या नावावर केली जाणारी लाखो रुपयांची उधळपट्टी रोखली गेल्याचे काही सदस्यांनी सांगितले. मात्र दुसरीकडे अध्यक्षांच्या या आदेशामुळे बोर्डाचे काही अधिकारी, सदस्या व ठेकेदांरांची झालेली ‘रिंग’ मोडल्याची चर्चा बोर्डात होती.