रावेर: राज्य सरकारने नुकताच पाच दिवसाचा आठवडा केला असून उद्या पासुन यावर अमलबजावणी होणार आहे. परंतु याला रावेर तालुका अपवाद ठरणार आहे. शासन जि.आर काढो की आदेश देओ, रावेरचा कारभार रेल्वे वेळापत्रकावरच चालणार आहे. भुसावळ, जळगाव, चाळीसगाव येथून शासकीय नोकरीसाठी हजारो अधिकारी कर्मचारी रावेर मध्ये येतात. यामध्ये पंचायत समिती, सार्वजनिक बांधकांम, दुय्यक निबंधक, सिटी सर्वे, कृषी विभाग, जलसंधारण, जि. प. बांधकाम, विभागासह अनेक इतर विभागाचे अधिकारी कर्मचारी दररोज रेल्वेने अप-डाउन करतात.
रावेर येथे नोकरीसाठी येणारे अधिकारी सकाळी पँसेंजरने येतात सायंकाळी एक्सप्रेसने जातात. यात गाडी वेळीवर आली तर कार्यालयात वेळेआधीच अधिकारी कर्मचारी जागेवरुन गायब होतात. अप-डाउन करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने जनशक्ती सोबत बोलतांना सांगितले की, शासन जिआर काढो की आदेश देओ आमचा कारभार रेल्वे वेळापत्रकावरच चालणार आहे. यामुळे नविन महाविकासआघाडीने काढलेल्या जिआर प्रमाणे सकाळी पावणे दहाला कार्यालयात उपस्थित रहाणे तर सायंकाळी सव्वा सहा पर्यंत कार्यालय सोडता येणार आहे. यामुळे रावेर तालुक्यात या जि.आरचे लक्तरे कशा प्रकारे वेशिला टांगले जाणार हे येत्या काही दिवसात समजणार आहे. आधीच सरकारी बाबूच्या अप-डाऊनमुळे सर्वसाधारण जनतेत संताप व्यक्त केला जात आहे.