उद्यापासून नंदुरबारला राज्यस्तरीय वारकरी संमेलन

0

नंदुरबार- येथे उद्यापासून सुरू होणाऱ्या राज्यस्तरीय वारकरी संमेलनाची तयारी संपूर्ण झाली असून या संमेलनात राज्यभरातून एक लाख माळकऱ्यांची हजेरी लागणार आहे अशी माहिती ह.भ.प.महाराज यांनी दिली. शहरातील माळीवाडा भागात उद्या २१ डिसेंबरपासून

राज्यस्तरीय वारकरी संमेलन, कीर्तन महोत्सव, ज्ञानेश्वरी पारायण आदी कार्यक्रम होणार आहे. २८ डिसेंबरपर्यंत कार्यक्रम सुरु राहणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जेष्ट समाज सेवक आण्णा हजारे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. नंदुरबार येथे होणाऱ्या या वारकरी संमेलनाचे आयोजन अखिल भारतीय वारकरी मंडळ नंदुरबार जिल्हा व समस्त माळी समाज नंदुरबार यांनी केले आहे.