भादलीनजीक तांत्रिक कामे होणार ; चार गाड्यांच्या मार्गातही बदल
भुसावळ- तिसर्या रेल्वे लाईनसह भादली रेल्वे यार्डमध्ये तांत्रिक कामे करण्यासाठी पाच पॅसेंजर गाड्या टप्प्याटप्प्याने रद्द करण्यात आल्या आहे तर डाऊन 59013 सुरत-भुसावळ पॅसेंजर व डाऊन 59077 सुरत-भुसावळ पॅसेंजर 5 ते 8 सप्टेंबर दरम्यान तसेच अप 59014 भुसावळ-सुरत पॅसेंजर व 590758 भुसावळ-सुरत पॅसेंजर 6 ते 9 सप्टेंबर दरम्यान रद्द करण्यात आली आहे. डाऊन 59075 सुरत-भुसावळ पॅसेंजर 5 ते 9 तर अप 59076 भुसावळ-सुरत पॅसेंजर 6 ते 10 दरम्यान रद्द करण्यात आली आहे. डाऊन 51181 देवळाली-भुसावळ पॅसेंजर 6 ते 10 तर अप 51182 भुसावळ-देवळाली पॅसेंजर 5 ते 9 दरम्यान रद्द असून डाऊन 51153 मुंंबई-भुसावळ पॅसेंजर व अप 51154 भुसावळ-मुंबई पॅसेंजर 6 ते 9 दरम्यान रद्द करण्यात आली आहे.
चार गाड्यांचे मार्ग बदलले
डाऊन 11039 कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस 8 रोजी दौंड, नगर, मनमाड, अकोला मार्गे तर अप 11040 महाराष्ट्र एक्स्प्रेस 9 रोजी अकोला, मनमाड, नगर, दौंड मार्गे धावेल. डाऊन 15017 एलटीटी-गोरखपूर काशी एक्स्प्रेस 9 रोजी मनमाड, पूर्णा, अकोला, वरणगाव, दुसखेडामार्गे धावेल तर अप 15018 काशी एक्स्प्रेस 8 रोजी दुसखेडा, वरणगाव, अकोला, पूर्णा, मनमाड मार्गे धावेल. डाऊन 12833 अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेस 9 रोजी गोदरा, नालदा, उज्जैन, भोपाळ, ईटारसी, नागपूर तर अप 12834 हावडा-अहमदाबाद एक्स्प्रेस 7 रोजी नागपूर, ईटारसी, भोपाळ, उज्जैन, नालदा, गोदरा मार्गे धावेल. डाऊन 22129 एलटीटी-ईलाहाबाद एक्स्प्रेस 9 रोजी मनमाड, पूर्णा, अकोला, वरणगाव, खंडवा मार्गे धावेल तर अप 12166 वाराणसी-एलटीटी एक्स्प्रेस 8 रोजी खंडवा, वरणगाव, अकोला, पूर्णा, मनमाड मार्गे धावेल. रेल्वे प्रवाशांनी बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन भुसावळ विभागाचे डीआरएम आर.के.यादव यांनी केले आहे.