उद्या कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठातर्फे व्याख्यानमाला

0

जळगाव- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्यावतीने सहकार महर्षि स्वा.भाऊसाो.प्रल्हादराव पाटील व्याख्यानमालेतंर्गंत उदया मंगळवार सप्टेंबर रोजी सामाजिक कार्यकत्र्या गुंजन गोळे-तळेगावकर (अमरावती) यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

श्री.संत मुक्ताबाई इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी, जळगाव यांनी विद्यापीठाला दिलेल्या देणगीतून या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. उदया मंगळवारी सायंकाळी 6 वाजता वाजता मुलींचे वसतिगृह क्र.1, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे गुंजन गोळे-तळेगावकर हे ‘स्त्रियांचे सामाजिक भान’या विषयावर व्याख्यान देणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यवस्थापन परिषद सदस्य, दिलीप रामू पाटील राहणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन जनसंपर्क अधिकारी डॉ.सुनील पाटील यांनी केले आहे.