उद्या निघणार 186 अतिक्रमणे

0

धुळे । शहरातील साक्रीरोडवरील 186 व्यावसायीक अतिक्रमणधारकांना सार्वजनीक बांधकाम विभागाने अतिक्रमण काढण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत. सिंचन भवनची वॉलकंपाऊंडच्या भिंतीवरही अतिक्रमण हटावचा बुल्डोझर चालविला जाणार आहे. दि.21 म्हणजेच उद्या पर्यंत स्वतःहुन अतिक्रमण काढण्यासाठी सार्वजनीक बांधकाम विभागाने अतिक्रमणधारकांना मुदत दिली आहे. त्यानंतर पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण हटविण्यात येणार आहे. विशेष म्हणजेच अतिक्रमणात नसलेले परंतु रस्ता रुंदीकरणाला अडसर ठरणारे भिम नगर समोरील सुयोग हॉस्पिटलचे तीन मीटर पर्यंत तोडकाम केले जाणार आहे. त्यासाठी हॉस्पिटल प्रशासनाला 28 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

गुरूवारपासून प्रत्यक्ष कारवाई
साक्रीरोडवर बहुतेक छोटे व्यावसायीकच आहेत.त्यामुळे त्यांनी आर्थिक नुकसान टाळण्यासाठी स्वतःहुन अतिक्रमण काढून घ्यावे असे आवाहन सार्वजनीक बाधंकाम विभागाचे पविभागीय उपअधिकारी एम.ए.शहा आणि शाखा अभियंता झाल्टे यांनी केले आहे. 22 पासून साक्रीरोडवरील अतिक्रमण हटविण्यात येणार आहे.साक्रीरोडच्या दक्षिणेकडील बाजूस रस्त्याच्या मध्यापासून सुरुवातीला 17 मिटरपर्यंत मोजमाप करण्यात आले होते.

सहकार्यांची भावना
काही ठिकाणी साडेसोळा आणि काही ठिकाणी पंधरा मिटरपर्यंत मोजमाप केले गेले होते. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने सहानभुतीची भुमिका घेत त्याचबरोबर रस्त्याचे ‘सौंदर्य’ टिकविण्याच्या उद्देशाने दक्षिणेकडील बाजूस सरसकट 14 मिटरपर्यंत अंतर घेतले आहे. रस्त्याच्या उत्तरेकडील बाजू देखील हेच अंतर आहे. सार्वजनीक बाधंकाम विभागाने सहानभुतीपुर्वक विचार केल्याने साक्रीरोडवरील अतिक्रमणधारकांनी देखील सहकार्याची भुमिका घेतल्याचे दिसत आहे. बहुसंख्य अतिक्रमणधारकांनी स्वतःहुन गेल्या 2 दिवसांपासून अतिक्रमणे काढायला सुरुवात केली आहे. यामुळे साक्रीरोडचे काम कुठल्याही अडथळ्याशिवाय, तणावाविना पार पडणार आहे. व्रावसारिकांनी स्वत:हून अतिक्रमणे काढण्रास सुरुवात केल्राने प्रत्रक्ष कारवाईच्रा दिवशी होणारा संघर्ष टळणार असल्राची चिन्हे रातून दिसून रेत आहे.

सिंचन भवनाची भिंत पाडणार
अतिक्रमण हटावनंतर रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटार त्यानंतर पाच फुटाचा फुटपाथ आणि मध्यभागी दुभाजक अशी रचना असणार आहे. साक्रीरोडच्या कामानंतर या मार्गावरील वाहतुक कोंडी सुटायला मदत होणार आहे.दि.22 रोजी ज्या अतिक्रमणधारकांनी अतिक्रमणे काढली नाहीत त्यांची अतिक्रमणे पोलिस बंदोबस्तात जेसीबीच्या मदतीने काढण्यात येतील. सुरवात मात्र सिंचन भवनच्या भिंतीने होणार आहे.सिंचनभवनची भिंत तीन फुट रस्त्याकडे आली आहे.त्याबाबत सिंचनभवन प्रशासनाला देखील बांधकाम विभागाने नोटीस पाठविली आहे.