मुंबई: जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाने भारतातही कहर केला आहे. रुग्ण संख्येत दररोज वाढ होत आहे. केंद्र सरकारसह राज्य सरकारने सर्व खबरदारी घेतली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार नवनवीन उपाययोजना करत आहे. याच पार्श्वभूमीवर उद्या दुपारी ४ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह आरोग्य मंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहे. यात मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांची मागणी ऐकून घेत उपाययोजनाबाबत सूचना देण्यात येणार आहे.
महाराष्ट्रात आतापर्यंत ४९ रुग्णांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. जवळपास ९०० पर्यंत रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहा मिनिटे राज्यातील जनतेला आवाहन केले. सरकारकडून सांगण्यात आलेल्या सर्व सूचनांचे पालन करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.