उद्या मंत्रिमंडळ विस्तार; शरद पवारांकडून आमदारांना फोन !

0

मुंबई: उद्या महाविकास आघाडीच्या सरकारचे पहिले मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. उद्या सोमवारी दुपारी १२ वाजेला मंत्रिमंडळ विस्तार सुरु होईल. शिवसेनेकडून १३, राष्ट्रवादीकडून १३ तर कॉंग्रेसकडून १० आमदारांना मंत्री पदाची शपथ दिली जाणार आहे. राष्ट्रवादीकडून स्वत: राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून शपथ घेणाऱ्या आमदारांना फोन केला जातो आहे. यापूर्वी ठाकरे सरकारमध्ये ६ मंत्र्यांनी शपथ घेतले होते. आता ३६ आमदार मंत्री पदाची शपथ घेणार आहे.

आज दुपारी साडेतीन वाजता दिल्लीत सोनिया गांधी यांच्यासोबत कॉंग्रेसच्या मंत्री पदाबाबत चर्चा होणार आहे. कॉंग्रेसच्या मंत्री पदाची यादी दिल्लीत आज निश्चित होणार आहे. बैठकीला कॉंग्रेस नेते दिल्लीला गेले आहे.