भोपाळ:ज्योतिरादित्य सिंधिया यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केला. सोबतच २२ आमदारांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे मध्य प्रदेशातील कॉंग्रेस सरकार मोठ्या संकटात सापडले. कालच माजी मुख्यमंत्री भाजप नेते शिवराज सिंह चव्हाण यांनी राज्यपालांची भेट घेऊन बहुमत चाचणी घेण्याची मागणी केली आहे. दरम्यान राज्यपालांनी तातडीने उद्याच १६ रोजी कमलनाथ सरकारला बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहे. उद्या कमलनाथ सरकारची मोठी अग्निपरीक्षा होणार आहे. दरम्यान उद्याच्या बहुमत चाचणीच्या पार्श्वभूमीवर भाजपने सर्व आमदारांना व्हीप जारी केला आहे. भाजपला मतदान करावे अशा आशयाचे व्हीप आहे.
उद्याच्या बहुमत चाचणीच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशातील राजकारण तापले आहे. कॉंग्रेससहित भाजपनेही आपल्या आमदारांना एकत्र हॉटेलमध्ये ठेवले आहे. कॉंग्रेसचे सर्व आमदार जयपूर येथे हॉटेलमध्ये एकत्र आहेत.