उद्या महाराष्ट्र बंदची हाक; यांचा नाही सहभाग

0

मुंबई-केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलची केलेली प्रचंड दरवाढ, महागाईत झालेली भरमसाठ वाढ यांसह विविध प्रश्नाबाबत सरकारच्या निषेध करण्यासाठी काँग्रेसने उद्या सोमवारी भारत बंदची हाक दिली आहे. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष, शेकाप, पीपल्स रिपब्लिकन पक्ष इत्यादी पक्षांनी महाराष्ट्र बंद करण्याचे जाहीर केले आहे.

केंद्र सरकारच्या विविध धोरणांच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या शिवसेना व मनसेनेही या बंदमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

केंद्रातील भाजप सरकारच्या जनविरोधी धोरणाचा निषेध म्हणून पुकारण्यात आलेल्या या बंदमध्ये सर्व विरोधी पक्षांनी, कामगार संघटना, टॅक्सी, रिक्षाचालक संघटना, दुकानदार, व्यापारी यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

व्यापारी संघटनेचा सहभाग नाही

काँग्रेस व अन्य पक्षांनी पुकारलेल्या भारत बंदमध्ये सहभागी होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. दूधपुरवठा, रुग्णालये, औषधांची दुकाने, शाळा, महाविद्यालये आदी सुरु राहणार आहे.