पुणे-मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे वर उद्या गुरुवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. यावेळी मुंबईहून पुण्याकडे जाणारी एक्स्प्रेस-वेची मार्गिका एक तासासाठी बंद असणार आहे. एक्स्प्रेस-वे वर सूचना फलक लावण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. उद्या दुपारी १२ ते १ दरम्यान पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक पुर्णपणे बंद असणार आहे. हा ब्लॉक फक्त गुरुवारीच घेण्यात येणार असल्याची माहिती एमएसआरडीसीने दिली आहे.
पुण्याकडून मुंबईकडे येणाऱ्या मार्गिकेवर कोणताही ब्लॉक नसणार आहे. त्यामुळे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहतुकीवर कोणताही परिणाम होणार नाही. ही वाहतूक नेहमीप्रमाणे सुरळीत असणार आहे.
ब्लॉक सुरु असताना एक्स्प्रेस-वे वरील वाहतूक जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वळवली जाणार आहे. गुरुवारी केवळ मुंबई-पुणे मार्गावर ब्लॉक घेण्यात येत असून गणपतीनंतर पुणे-मुंबई मार्गावर असाच ब्लॉक घेऊन सूचना फलक लावले जाणार आहेत. एक्स्प्रेस-वे वर बोरघाटात अथवा कुठेही वाहतूक कोंडी झाल्यास पर्यायी मार्गांजवळ प्रवाशांसाठी सूचनांसह अनेक फलक लावण्यात येणार आहेत.