उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार मोदींची भेट?

0

मुंबई: विधानसभा निवडणुकीनंतर राज्याती सत्तासंघर्षामुळे भाजप आणि शिव्सेनेंचे संबंध खूप ताणले गेले. अखेर युतीत फारकत होऊन महाविकास आघाडीचे सरकार बनले. २५ वर्षापासूनची युतीत झालेल्या तणावामुळे भाजप आणि शिवसेनेचे संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. दरम्यान सत्ता स्थापनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांची भेट घेतलेली नाही. उद्या ते मोदींची भेट घेण्याची शक्यता आहे. सोमवारपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे पंतप्रधानांची भेट घेऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र अद्याप पंतप्रधान कार्यालयाकडून मुख्यमंत्र्यांना भेटीसाठी वेळ देण्यात आलेला नाही. मुख्यमंत्री राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी मोदींची सदिच्छा भेट घेऊन राज्यासाठी आर्थिक मदत मागू शकतात.

‘मुख्यमंत्री झाल्यावर मी दिल्लीला जाणार आहे. माझ्या मोठ्या भावाची भेट घेणार आहे. कारण पंतप्रधान मोदी मला त्यांचा लहान भाऊ म्हणतात,’ असं उद्धव ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांना संबोधित करताना म्हणाले होते.