जळगाव- ग्रामिण राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्या बुथ कमिटी कार्यकर्ता मेळावा उद्या रविवार २ संष्टेबर रोजी सकाळी ११ वाजता सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात ( लेवा भवन , डॉ.आंबेडकर मार्केट जवळ ) आयोजित करण्यात आला आहे.
आगामी लोकसभा व विधानसभेच्या तयारीसाठी मतदारसंघातील बुथ कमिटी कार्यकर्त्याना राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्यात आमदार डॉ.सतिष पाटील, पक्षाचे जेष्ठ नेते अरूणभाई गुजराथी, माजी खासदार ईश्वर जैन, जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्र पाटील , कार्यध्यक्ष विलास पाटील, अल्पसंख्यांक प्रदेश आघाडीचे अध्यक्ष हाजी गफ्फारभाई मालिक हे उपस्थितीत राहणार आहे.
जळगाव ग्रामिण मतदार संघातील जास्तीत जास्त युवक कार्यकर्ते , बुथ कमिटी सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थितीत रहावे , असे आवाहन माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, युवक जिल्हाध्यक्ष ललित बागुल, विधानसभा क्षेत्र प्रमुख रमेश माणिक पाटील , जळगाव तालूकाध्यक्ष बापू परदेशी, युवक अध्यक्ष विनायक चव्हाण , धरणगाव तालूकाध्यक्ष धनराज माळी, युवकध्यक्ष नाटेश्वर पवार , धरणगाव शहराध्यक्ष हेंमत चौधरी , युवक अध्यक्ष संभाजी कंखरे यांनी केले आहे.