उद्या शरद पवारांची पारोळ्यात सभा !

0

जळगाव: राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. आज सोमवारी माघारीची अंतिम मुदत आहे. माघारीनंतर चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान राज्यभरात प्रचाराचा झंझावात सुरु आहे. १३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींची जळगावात सभा होणार आहे. दरम्यान उद्या 8 रोजी जळगावातील पारोळा येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रचार सभा होणार आहे. पारोळ्यातून राष्ट्रवादी-कॉंग्रेस आघाडीकडून आमदार डॉ.सतीश पाटील हे निवडणूक लढत आहे.

राष्ट्रवादीच्या अनेक बड्या नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे कॉंग्रेस पक्षात काहीशी मरगळ दिसून येत आहे. यावर मात करण्यासाठी स्वत: शरद पवार राज्यभर प्रचार सभा घेणार आहे.