पिंपरी :- केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात देशातील विविध कामगार संघटनांनी आज (बुधवारी) भारत बंदची हाक दिली आहे. कामगारांची नगरी असलेल्या पिंपरी चिंचवड शहरातून हजारो कामगारांनी दुचाकी रॅली काढली. पिंपरीतून कामगार वाकडेवाडी येथील कामगार आयुक्त कार्यालयावर धडकले असून तेथून जिल्हाधिकारी कार्यालयावर लाँग मार्च काढण्यात येणार आहे. कंत्राटीकरण, जनविरोधी खासगीकरण रद्द करण्यासाठी, सार्वत्रिक सामाजिक संरक्षणेच्या हक्कासाठी माथाडी व बांधकाम असघंटीत कामगारांच्या सक्षमींकरणासाठी कामगारांनी अखिल भारतीय संप पुकारला आहे. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकातून दुचाकी रॅली मार्गस्थ झाली.
भारतीय कामगार सेना महासंघाचे उपाध्यक्ष, महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष, शिवसेनेचे कामगार नेते इरफान सय्यद, इंटक, कामगार संघटना कृती समितीचे अध्यक्ष कैलास कदम, श्रमिक एकता महासंघाचे दिलीप पवार, राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे किशोर ढोकले यांच्यासह महाराष्ट्र मजदूर संघटनेचे सल्लागार बाळासाहेब शिंदे, कार्याध्यक्ष परेश मोरे, उपाध्यक्ष खंडू गवळी, जन.सेक्रेटरी प्रवीण जाधव, सर्जेराव कचरे, भिवाजी वाटेकर, ज्ञानोबा मुजुमले, मुरलीधर कदम, पांडुरंग कदम, सतीश कंठाले, गोरक्ष डुबाले, सुनील सावले, राजेन्द्र तापकिर, अशोक साळुंके, श्रीकांत मोरे, बाबासाहेब पोते, चिमाजी वाळुंज, सोपान तुपे, बबन काळे, समर्थ नाईकवडे, लक्ष्मण सापते, एकनाथ तुपे, शंकर मदने, ज्ञानेश्वर पाचपुते, उद्धव सरोदे, सोपान घाडगे, राजेश आवटे, आबा मांढरे हजारो कामगार यामध्ये सहभागी झाले आहेत. यामध्ये महाराष्ट्र राज्य सर्वश्रमिक संघ, हिंद कामगार संघटना, विमा, बँका, संरक्षण, पोस्ट, बीएसएनएल, राष्ट्रवादी कामगार सेल, वीज मंडळ, आरोग्य कर्मचारी रेल्वे, अंगणवाडी, आशा इत्यादी हजारो कामगार भारत बंद मध्ये सहभागी झाल्याचे कामगार नेत्यांनी सांगितले.