उद्योगपती धारीवाल यांची शोकसभा

0

शिक्रापूर । शिरुर येथील उद्योगपती रसिकलाल माणिकचंद धारीवाल यांचे नुकतेच निधन झाले. यानिमित्ताने शिरुरवासीयांनी रविवारी (दि.5) पंचायत भवन येथे श्रद्धांजलीपर शोकसभेचे आयोजन केले होते.या श्रध्दांजली सभेच्या निमित्ताने प्रदिप कंद यांनी स्व. धारीवाल यांना आदरांजली वाहून त्यांच्या कार्याचा गौरव केला. समाजाप्रती संवेदनशीलता असल्यामुळे शिरुर व जिल्ह्यातील अनेक गरजुंना त्यांनी मदतीचा हात दिला. राजकारण आणि समाजकारणातील त्यांचे विचार समाजाच्या जडणघडणीमध्ये महत्वपूर्ण ठरणारे आहेत, असे त्यांनी सांगितले.

माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, आमदार बाबुराव पाचार्णे, अशोकबापु पवार, रणजितसिंह मोहिते पाटील, संग्राम जगताप, काकासाहेब पंलाडे, पोपटराव गावडे, नगराध्यक्षा वैशाली वाखारे, आजी माजी नगरसेवक, विविध गावचे सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.