उद्योगांची शिखर परिषद पुढील महिन्यात

0
पिंपरी : शहरातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या अडचणी सोडविण्यासाठी पिंपरी-चिंचवड चेंबर ऑफ इंडस्ट्रीज कॉमर्स, सर्व्हिसेस अँड अग्रिकल्चरच्यावतीने पुढील महिनाभरात शिखर परिषद आयोजित केली आहे. या परिषदेत राज्यातील एमआयडीसी क्षेत्रास स्वतंत्र औद्योगिक वसाहतीचा दर्जा देण्यात यावा, फॅक्टरीज हा शब्द वगळावा, एमआयडीसीच्या भूखंडावरील झोपड्यांच्या ठिकाणी पुनर्वसन योजना राबविण्यास विरोध करणे, प्रत्येक ब्लॉकमध्ये स्वतंत्र पाणी शुध्दीकरण, कचरा विघटन प्रकल्प सुरु करणे, एमआयडीसी क्षेत्राला पंचतारांकित दर्जा देणे, आदी विषयावर चर्चा करण्यात येणार आहे, अशी माहिती अ‍ॅड.आप्पासाहेब शिंदे यांनी दिली.