मुंबई । देशात जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी 1 जुलैपासून होणार आहे. या कर प्रणालीच्या अनुषंगाने राज्यातील उद्योग- व्यापारी जगताने तयार राहावे, असा आदेश केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिला.
राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे सह्याद्री अतिथीगृहात राज्यातील विविध उद्योग- व्यापार क्षेत्रातील संघटनांची जीएसटीच्या विषयावर केंद्रीय अर्थमंत्र्यांसमोर बैठक आयोजित केली. यावेळी उद्योग- व्यापार्यांच्या प्रतिनिधींच्या अडचणी समजून घेतल्यानंतर जेटली बोलत होते. जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर प्रणालीचा प्रारूप मसुदा जनतेसाठी खुला ठेवण्यात आला होता. त्यातील नियम आणि तरतुदींवर उद्योग-व्यापारी जगतातील प्रतिनिधी, सर्व संबंधित घटकांशी चर्चा करून त्यास अंतिम स्वरूप देण्यात आले आहे, असे सांगून जेटली म्हणाले की, येत्या आठवड्यात या प्रारूप मसुद्यावर अंतिम निर्णय होऊन तो संसदेत चर्चेसाठी सादर केला जाईल. जीएसटीमध्ये करदर 0,5,12,18,28 अशा स्लॅबमध्ये ठेवण्यात आले आहेत, असे अर्थमंत्री जेटली म्हणाले.
Next Post