उद्योजकाची फसवणुक करणार्‍यांविरोधात गुन्हा

0

जळगाव प्रतिनिधी । शहरातील निक्की अ‍ॅग्रो प्रॉडक्ट या कंपनीतून माल घेऊन फसवणूक करणार्‍यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अकोला येथील दलाल कल्पेश शर्मा व व्यापारी राहुल मेहता हे २८ एप्रिल रोजी एमआयडीसीतील निक्की अ‍ॅग्रो प्रॉडक्स प्रा.लि.या कंपनीत गेले होते. त्यांनी कंपनीचे व्यवस्थापक मोहन रघुनाथ नेरकर यांची भेट घेतली. पारस दाल मिल अकोलासाठी त्यांनी २१ टन डाळ खरेदी केली. याचे मूल्य ३ लाख ४ हजार ७१० रुपये झाले. पारस दालमिलचे मालक मेहता यांनी २५ जुलै रोजी अकोला अर्बन को. ऑपरेटिव्ह बँकेचे प्रत्येकी ९८ हजार ७० रुपयांचे तीन धनादेश दिले. उर्वरित १० हजार ५०० रुपये माल पोहोच झाल्यावर चालकाजवळ देतो, असे सांगितले. त्याप्रमाणे संबंधीतांना माल देण्यात आला. मेहता यांनी ती खाली करून घेतली. परंतु उर्वरित १० हजार ५०० रुपये चालकाला दिले नाहीत. दरम्यान, यासाठी दिलेला चेकदेखील वटला नाही. याबाबत कंपनीचे मालक दीपक कांतीलाल जैन यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यानुसार २१ टन हरभरा व चुणी खरेदी करून ३ लाख ४ हजार ७१० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शर्मा व मेहता यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.