उद्योजक राघव बहल यांच्या निवासस्थानी आयकर विभागाची छापेमारी

0

नवी दिल्ली- माध्यम उयोजक राघव बहल यांच्या निवासस्थानावर आयकर विभागाने कर चुकविल्या प्रकरणात छापा टाकले आहे. आज सकाळी नोएडा येथील त्यांच्या निवासस्थानी अधिकाऱ्यांच्या पथकांनी धाड टाकत चौकशी केली. प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे व इतर पुरावे शोध अधिकारी घेत आहे. राघव बहल न्यूज नेटवर्क 18 ग्रुपचे संस्थापक आहेत. जे नंतर मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड यांना विकले गेले. राघव बहल यांनी अधिकाऱ्यांना चौकशीत सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे सांगितले आहे.