उद्योजक श्रीराम पाटील यांनी आगामी विधानसभा सेना तिकीटावरून लढवावी

आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली खुली ऑफर : वाढदिवसानिमित्त रावेरात सहृदय सत्कार

रावेर : आगामी 2024 ची विधानसभा उद्योजक श्रीराम पाटील यांनी शिवसेनेच्या तिकीटावर लढवावी, सर्वांगीण विकास तसेच युवकांना रोजगार देण्याचे स्वप्न निवडून येऊन पूर्ण करावे, आम्ही आपल्या पाठीशी असल्याचे ग्वाही आमदार चंद्रकांत पाटील येथे दिली. श्रीराम पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित् साधत त्यांना शुभेच्छा देत थेट त्यांनी विधानसभा निवडणुकीची ऑफर दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना सुरूवात झाली आहे. उद्योजक श्रीराम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मॅक्रोव्हीजन स्कूल आवारात कार्यक्रम झाला. आमदार पाटील यांनी उद्योजक श्रीराम पाटील यांना खुल्या व्यासपीठावरुन विधानसभा सेनेकडून निवडणूक लढविण्याची खुली ऑफर दिली. यावेळी उद्योजक श्रीराम पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी एकच गर्दी झाली होती.

यांची होती प्रमुख उपस्थिती
यावेळी जिल्हा परीषद अध्यक्षा रंजना पाटील, माफदा अध्यक्ष विनोद तराळ, जिल्हा परीषद सदस्य नंदकिशोर महाजन, जिल्हा परीषद शिक्षण क्रीडा सभापती रवींद्र सूर्यभान पाटील, आरोग्य सभापती प्रमोद पाटील, स्वप्नील पाटील, पंचायत समिती सभापती कविता कोळी, नगराध्यक्ष दारा मोहम्मद, स्वामी शाळेचे अध्यक्ष रवींद्र पवार, डी.डी.बच्छाव, डॉ.संदीप पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष नीळकंठ चौधरी, डॉ.गुलाबराव पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख योगीराज पाटील, पीपल्स बँक अध्यक्ष प्रवीण पाचपोहे, माजी नगराध्यक्ष शीतल पाटील, गोपाल दर्जी, जे.के.पाटील, प्रल्हाद पाटील, विजय गोटीवाले, गोटू शेट, हरीषशेट गनवाणी, अशोक शिंदे, यु.डी.पाटील, ज्ञानेश्वर महाजन, रमेश पाटील, सुरेश पाटील आदी उपस्थित होते.

रुग्णवाहिकेचे झाले लोकार्पण
यावेळी मतदारसंघातील नागरीकांच्या आरोग्यासाठी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यावेळी रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले तसेच उद्योजक श्रीराम पाटील यांची लाडूतुला करून रावेर तालुक्यातील वाचनालयांना स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे वाटप करण्यात आले.

संकटकाळात नेहमीचे सहकार्य -श्रीराम पाटील
वाढदिवसानिमित्त सत्काराला उत्तर देतांना उद्योजक श्रीराम पाटील म्हणाले की, सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असून लवकरच या भागातील युवकांना रोजगार देण्यासाठी एका व्हिजनवर काम सुरू असून ते पूर्ण झाले की, अनेकांना रोजगार मिळेल तसेच रावेर तालुक्यातील शेतकर्‍यांवर जेव्हा-जेव्हा नैसर्गिक संकट आले आहे, तेव्हा-तेव्हा श्रीराम फांऊडेशनने मदत केली आहे. आमदार चंद्रकांत पाटलांच्या शुभेच्छा संदेशावर नक्की विचार केला जाणार असल्याचे आश्वासन त्यांनी उपस्थितांना दिले.