उद्योजक सुभाष ललवाणी यांची अखिल भारतीय जैन कॉन्फरन्स, नवी दिल्लीच्या सदस्यपदी बिनविरोध निवड

0

कजगाव- गावातील मूळ रहिवासी पुणे (निगडी) वास्तव्यास असलेले उद्योजक सुभाष ललवाणी यांची अखिल भारतीय जैन कॉन्फरन्स, नवी दिल्लीच्या सदस्य पदी बिनविरोध निवड करण्यात आली. मूळचे कजगाव, ता.भडगाव येथील रहिवासी तसेच प्रमोद ललवाणी यांचे मोठे बंधू असलेल्या सुभाष ललवाणी हे गेल्या 40 वर्षांपासून पुण्यात स्थायीक झाले असून फिरोदिया उद्योग समुहात अनेक वर्ष त्यांनी नोकरी केली. ती करीत असताना सामाजिक कार्यात सहभाग घेत अनेक कामे त्यांनी केली. समाजातील दोन हजार दोनशे लग्न त्यांच्या पुढाकाराने झाली असून समाज कार्यात सदैव तत्पर असलेल्या ललवाणी हे अनेक संस्थेवर कार्यरत आहेत. यात अखिल भारतीय जैन संघटना, अखिल भारतीय जैन मोदी, ललवाणी, खाबिया, कलवानी, मलवाणी परीवार संस्थेवर ते कार्यरत आहे. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या सुभाष ललवाणी यांची अखिल भारतीय जैन कॉन्फरन्स राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यपदी बिनविरोध निवड झाल्याने त्यांच्यावर सर्व स्तरावरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.