भुसावळात केली कारवाई : आरोपीसह वाहन उधना पोलिसांच्या ताब्यात
भुसावळ : उधना येथून चोरी करून आणलेली इको चारचाकी भुसावळात एक संशयीत विना क्रमांकाने फिरवत असल्याची माहिती जळगाव गुन्हे शाखेने मिळाल्यानंतर पथकाने संशयीत आरोपी नितीन रामलाल राजपूत (37, रा.लोहारा, ता.पाचोरा, जि.जळगाव) यास मंगळवारी अटक केली. आरोपीच्या ताब्यातून चारचाकी जप्त करण्यात आली असून आरोपीसह चारचाकीचा उधना पोलिसांना ताबा देण्यात आला. ही कारवाई जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय अशोक महाजन, हवालदार शरीफ काझी, नाईक युनूस शेख, नाईक किशोर राठोड, कॉन्स्टेबल विनोद पाटील, कॉन्स्टेबल .रणजीत जाधव यांनी केली. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून चोरीबाबत उधना पोलिसात गुन्हा दाखल असल्याचे सूत्रांनी सांगितले.