उधारी मगितल्यावरून वार

0

चर्‍होली : फ्लेक्सची उधारी मगितल्याच्या कारणावरून एकावर धारदार शस्त्राने वार करण्यात आला. ही घटना येथे रविवारी (दि. 22) रात्री दहाच्या सुमारास घडली. राजकुमार कसबे (वय 36, रा. साठेनगर) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कसबे यांचा भाऊ उमेश कसबे फ्लेक्सचा व्यवसाय करतो. च-होली गावाच्या उरुसावेळी समद मुलाणी याने उमेशकडून फ्लेक्स उधार छापून घेतला होता. ते पैसे उमेशने मुलाणी याच्याकडे मागितले. त्यावरून उमेश आणि मुलाणी यांच्यामध्ये किरकोळ वाद झाला. त्यानंतर मुलाणी याने पाच-सहा जणांना सोबत घेऊन रविवारी रात्री दहाच्या सुमारास कसबे यांच्या घराच्या बाहेर आले. उमेश आणि मुलाणी यांच्यात झालेले भांडण मिटविण्यासाठी उमेशचा भाऊ राजकुमार याला घराबाहेर बोलावून घेतले. उमेश आमच्याकडून पैसे का मागतो, असे म्हणून राजकुमार यांना मारहाण केली. तसेच टोळक्यातील एकाने धारदार शस्त्राने राजकुमारच्या पोटावर वार केले. यामध्ये राजकुमार गंभीर जखमी झाला. यावरून सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपी समद मुलाणी याला अटक करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक एस. जे. शेंडगे तपास करीत आहेत.