उधेवाडीची नवव्या वर्षीही शंभर टक्के कर वसुली

0

लोणावळा : राजमाची किल्लयांच्या पायथ्याजवळील दुर्गम आदिवासी ग्रामपंचायत असलेल्या उधेवाडी ग्रामपंचायतीने 1 एप्रिल रोजी गावाची शंभर टक्के कर वसुली करण्याचा पायंडा सलग नवव्या वर्षी कायम ठेवत महाराष्ट्रासमोर एक आदर्श घालून दिला आहे. मागील 9 वर्षापासून या ग्रामपंचायतीमध्ये आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी गावाची शंभर टक्के कर वसुली केली जाते. ग्रामपंचायतीने शासन निर्देशानुसार सुधारित पद्धतीने कर वसुली केली. गावातील बहुतांश नागरिक हे गरिब व आदिवासी असताना देखील ते कसलेही आढेवेडे न घेता उत्स्फुर्तपणे 1 एप्रिलला शंभर टक्के कर भरणा केला. याकामी मावळचे गट विकास अधिकारी निलेश काळे, सहाय्यक गट विकास अधिकारी गुजर, विकास अधिकारी बाळासाहेब दरवडे यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.