उध्दरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे

0

भुसावळ। भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 126 वी जयंती शहर व परिसरातील विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय संस्था- संघटनांतर्फे शुक्र्रवार 14 एप्रिल रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्सव रौ
प्य महोत्सवी जन्माचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मध्यरात्री 12 वाजता जल्लोष करण्यात आला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. बाबासाहेबांना अभिवादनासाठी जनसागर उसळला होता. प्रारंभी सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संतोष बारसे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर अभिवादन करण्यात आले. रात्री उशीरार्पयत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जनसागर लोटलेला होता.

पुतळ्याजवळ झाला समारोप
शहराच्या विविध भागातून निळे ध्वज हातात घेऊन अनुयायी पुतळ्याजवळ येत होते. डॉ.बाबासाहेब यांचा पुतळा परीसर सुशोभीत करण्यात आला होता. प्रसंगी पोलीस बंदोबस्त राखण्यात आला होता. यानिमित्त शहरातील विविध भागातून ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत शोभायात्रा, मिरवणूका काढण्यात येऊन त्यांचा नगरपालिकेसमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ समारोप करण्यात आला व महामानवास अभिवादन करण्यात आले.

पीआरपीच्या शिबीरात 300 जणांचे रक्तदान
पीआरपीतर्फे रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन डिवायएसपी निलोत्पल यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये 300 जणांनी रक्तदान केले. यशस्वीतेसाठी आरोग्यम् पॅरामेडीकल इन्स्टिट्युटसह धन्वंतरी ब्लड बँकेचे सहकार्य लाभले. यात नागरिकांचे हिमोग्राम, काविळ, गुप्तरोग, मलेरिया, एचआयव्ही यांसारख्या रोगांची मोफत तपासणी करण्यात आली. याप्रसंगी पीआरपी जिल्हाध्यक्ष जगन सोनवणे, सचिन चौधरी, जनाधार पार्टीचे गटनेता उल्हास पगारे, नगरसेविका पुष्पा सोनवणे, रविंद्र सपकाळे उपस्थित होते. शिबीरासाठी आरोग्यम् पॅरामेडीकलचे अध्यक्ष शशी रॉय, डॉ. सौरभ तायडे, जयश्री चव्हाण, राहुल शिंदे यांनी परिश्रम घेतले.

शहर शिवसेनेतर्फे पुष्पहार अर्पण
शहर शिवसेनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. शहर प्रमुख व नगरसेवक मुकेश गुंजाळ शिवसेना, उपशहर प्रमुख राकेश खरारे, विभाग प्रमुख उमाकांत शर्मा (नमा), निखिल सपकाळे, अर्जुन पाटील, रणजीत मट्टू, गौतम तायडे, अरुण साळुंके, आशिष अडकमोल, सुमित गायकवाड, अर्जुन पट्टेवाल आदी उपस्थित होते.

काँग्रेस, राष्ट्रवादीतर्फे संयुक्त कार्यक्रम
शहर काँग्रेस कमेटी व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जयंती साजरी करण्यात आली. काँग्रेसचे शहराध्यक्ष रविंद्र निकम, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शेख पापा शेख कालू, तालुकाध्यक्ष रविंद्र पाटील, संजय ब्राह्मणे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी युवक काँग्रेसचे योगेंद्रसिंग पाटील, सरचिटणीस रहिम कुरेशी, इस्माईल गवळी, तस्लीम खान, विजय तुरकेले, प्रकाश मोरे, राष्ट्रवादीचे उमेश नेमाडे, विनोद निकम, एम.आर. तायडे, अन्वर तडवी, अन्सार कुरेशी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

महाराणा प्रताप विद्यालय
महाराणा प्रताप विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक प्रकाश चौधरी यांनी बाबासाहेबांच्या जीवन कार्यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सुधीर भोळे यांनी विद्यार्थ्यांना शिकत राहण्याचा सल्ला दिला. यावेळी बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमधून सार्थक बाविस्कर, वरद देशपांडे, प्रणय येवलेकर, ललीत चौधरी यांनी बाबासाहेबांचे विचार मांडले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पल्लवी चौधरी यांनी केले.

रा.स्व. संघातर्फे अभिवादनासह व्याख्यानाचा कार्यक्रम
राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे विविध उप्रकम राबविण्यात आले. सकाळी पालिकेसमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी संघाचे शहर संघचालक डॉ. विजय सोनी, प्रांत शारिरीक शिक्षा प्रमुख प्रशांत देवरे, शहर बौध्दीक प्रमुख किरण सोहळे, शहर धर्मजागरण प्रमुख प्रशांत वैष्णव, शिवाजी नगर नगरप्रमुख अरविंद वाजपेयी, उमेश चव्हाण, राजू कुलकर्णी, विश्‍व हिंदू परिषदेचे विजय घोरपडे आदी उपस्थित होते. तसेच संघ कार्यालयात व्याख्यानाचा कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हा कार्यालय प्रमुख प्रकाश चौधरी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबासाहेबांच्या जीवन कार्यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व बाबासाहेबांचे विचार आत्मसात करुन त्याचा समाजहितासाठी उपयोग करण्याचे आवाहन केले. यावेळी जयेश सुरवाडे, दिपक सोनवणे, हर्षल भांडारकर यांनीही मनोगत व्यक्त केले.

लेझीम पथकाने वेधले लक्ष
समता सैनिक दलाच्या वतीने प्रमुख मार्गाने लझीम पथकाद्वारे कवायती सादर करण्यात आल्या. विशेष म्हणजे यात चिमुकल्यांनी देखील सहभाग घेतल्याने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. जिल्हा प्रमुख मेजर युवराज नरवाडे यांनी निळा झेंडा फडकवून लेझीम पथक रॅलीस सुरुवात करण्यात आली. पंचशील नगर येथून सुरुवात होऊन प्रमुख मार्गाने जाऊन डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याजवळ समारोप करण्यात आला. पथकाचे नेतृत्व जिल्हा सचिव रमेश सावळे यांनी केले. पथकात सुमीत सावळे, प्रफुल्ल नरवाडे, रुपेश वानखेडे, अहिंसक नरवाडे, रितेश इंगळे, आदीत्य गोसावी, साहिल सोनवणे, नेहा सावळे, विशाखा तायडे, स्वाती सावळे, रोशनी दाभाडे, पुजा सोनवणे, रोहिणी सोनवणे, अष्टमी नरवाडे यांचा सहभाग होता.