उध्दव ठाकरेंचे योगींच्या पावलावर पाऊल; कोटामधून २००० विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणणार

0

मुंबई – उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ सरकारप्रमाणेच महाराष्ट्र सरकारनेही कोटामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना राज्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याशी चर्चा केली. याची माहिती उद्धव ठाकरे यांनी ट्विट करत दिली आहे. महाराष्ट्र सरकारने राजस्थान सरकारला विनंती पत्र पाठवले आहे. यामध्ये कोटामध्ये अडकलेल्या १८०० चे २००० विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात सोडावे अशी विनंती केली आहे. राज्यात माघारी परतल्यानंतर त्या सर्वांना १४ दिवसांसाठी क्वांरटाइन करण्यात येईल, असेही म्हटले आहे.

राजस्थानमधील कोटा येथे महाराष्ट्राचे १८०० ते २००० विद्यार्थी लॉकडाउनमुळे अडकले आहेत. उत्तर प्रदेश आणि हरियाणा सरकारने कोटामध्ये अडकेलेल्या आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांना माघारी आणले आहे. यामुळे महाराष्ट्रातील विद्याथ्यार्र्ंनाही परत आणण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून होत होती. यानुसार, महाराष्ट्र सरकारने राजस्थान सरकारला पत्र पाठवले आहे. केंद्र आणि राज्यस्थान सराकरने परवानगी दिल्यानंतर दोन ते तीन दिवासांमध्ये विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठी योजना आखली जात आहे.