ठाणे: ठाण्यात इनडोअर जिम्नॅस्टीक सेंटर, वर्कींग वुमन्स हॉस्टेल आणि ग्रँड सेंट्रल पार्क या महत्वाकांक्षी प्रकल्पांचा भूमीपूजन समारंभ शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते शनिवार होणार आहे. याबरोबरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे कम्युनिटी पार्क, महा डॉट ओ ओ ओ या संकेतस्थळांचं उद्घाटनही ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.